मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेनं नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. नुकताच हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाहचा साखरपुडा पार पडला. हृताच्या साखरपुड्यातील व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. हृता सध्या 'मन उडू उडू झालं' या मालिकेमध्ये दीपूची भूमिका साकारत आहे. हृताच्या 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रतिक शाह सिनेमा आणि टीव्ही विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. हृता दुर्गुळेचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. दोघांनी आपापल्या सोशल मीडियावरुन साखरपुड्याचे फोटो टाकले आहेत प्रतिकची आई मुग्धा शाह ही देखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.