मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मानुषी छिल्लर सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. यशराज प्रॉडक्शन अंतर्गत तयार होत असलेल्या 'पृथ्वीराज' या चित्रपटात ती लवकरच दिसणार आहे. या चित्रपटात ती सुपरस्टार अक्षय कुमारसोबत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. पदार्पणापूर्वीच मानुषी तिच्या बोल्ड लूकमुळे आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत येऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून मानुषीचे फोटोशूटमधून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मानुषी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा खूप प्रयत्न करते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता मानुषीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. मानुषीने वेगवेगळ्या पोझ देत दोन फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये मानुषी खूपच हॉट दिसत आहे .