मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं आहे. अशातच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून अनेकांनी पाठिंबा दिला आहे.राज्यभरातील मराठे एकत्र आले आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा प्रभाव राजकीय वर्तुळातही दिसून येत आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील 3 आमदार आणि दोन खासदारांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये शिंदे गटाचे 2 खासदार, 1 आमदार, काँग्रेसचा एक आमदार आणि भाजपच्या एक आमदाराचा समावेश आहे. खा. हेमंत पाटील हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील खा. हेमंत गोडसे नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आ. रमेश बोरनारे वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे आ. सुरेश वरपूडकर परभणीचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर आ. लक्ष्मण पवार गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार