मंदिरा बेदी हिने केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर यशस्वी मॉडेल, फॅशन डिझायनर आणि टीव्ही प्रेझेंटर म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे.



मंदिरा बेदी ही अशी अभिनेत्री आहे, जिने 90च्या दशकातील टीव्ही शो 'शांती' द्वारे घराघरात आपला ठसा उमटवला होता.



मंदिरा बेदीचा जन्म 15 एप्रिल 1972 रोजी कोलकाता येथे झाला. यावेळी ती तिचा 50वा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे.



पतीच्या निधनानंतर मंदिरा आता एकटीच दोन मुलांचे संगोपन करत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, एक काळ असा होता जेव्हा मंदिरा बेदी आई बनण्यासाठी घाबरत होती.



मंदिरा बेदीला आई होण्याची भीती वाटत होती. तिने स्वतः याचा खुलासा केला होता आणि सांगितले होते की, तिला आधी गर्भधारणेची भीती वाटत होती.



गर्भधारणेमुळे आपली कारकीर्द संपुष्टात येईल, अशी भीती तिला होती. मंदिराला वाटले की, आई झाल्यानंतर तिला काम मिळणार नाही.