खरा हिरा केवळ सोनारच ओळखू शकतो, असं म्हटलं जातं. असाच एक हिरा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन (Robert Hoffman) याने शोधून काढला आहे.



'सिटी ऑफ ड्रीम' अशी ओळख असणाऱ्या मुंबई (Mumbai) शहरातील एका चिमुकलीचं आयुष्य रॉबर्ट हॉफमॅनमुळे पूर्णपणे बदललं आहे.



2020 मध्ये जेव्हा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन हा मुंबईमध्ये आला होता.



तेव्हा तो मलीशा खारवा ( Maleesha Kharwa) नावाच्या धारावीमध्ये राहणाऱ्या चिमुकलीला भेटला होता.



मलीशा ही जेव्हा रॉबर्ट हॉफमॅनला भेटली तेव्हा रॉबर्टनं तिच्यासाठी 'गो फंड मी' नावाचे पेज सुरु करण्याचे ठरले. त्यानंतर मलीशा ही फेमस होण्यास सुरुवात झाली.



मलीशा ही सोशल मीडियावर जेव्हा फेमस झाली तेव्हा तिला दोन हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स देखील आल्या.



तिनं लिव योर फेयरीटेल या शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केलं आहे.



14 वर्षाची मलीशा ही आता 'द युवती कलेक्शन' या ब्रँडचा चेहरा बनली आहे. या ब्रँडच्या प्रत्येक प्रोडक्टवर मलीशाचा फोटो आहे.



मलीशा ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर देखील आहे. तिला इन्स्टाग्रामवर 235K फॉलोवर्स आहेत.



मलीशा ही विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. या पोस्ट शेअर करताना ती अनेकदा The Princess From The Slum या हॅशटॅगचा वापर करते. त्यामुळे ती 'स्लम प्रिंसेस'या नावानं देखील ओळखली जाते.