अयोध्येला राम मंदिराचे निर्माण होत आहे.

त्या निमित्ताने वर्ध्यात सव्वा किलो चांदीतून अयोध्या येथील निर्माणाधीन राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्सने दिल्लीहून ही प्रतिकृती तयार केली.

श्री रामनवमीनिमित्त वर्ध्याच्या गोल बाजार येथील श्रीराम मंदिरात दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.

प्रतिकृती तयार करण्यास सात ते आठ कारागिरांना एक महिन्याचा कालावधी लागला आहे.

चांदीच्या प्रतिकृतीत कोरीव काम करण्यात आले आहे.

भाविकांसाठी आकर्षण ठरणारे अयोध्येतील राम मंदिर चांदीच्या रुपात वर्ध्यात दिसत आहे.

श्री राम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने भाविक दर्शनासाठी येत आहे.

राम मंदिराची ही प्रतिकृती भाविकांसाठी आता दर्शनीय ठरते आहे.

Thanks for Reading. UP NEXT

ना बीअर, ना रम... 'या' दारुची भारतीयांना भूरळ

View next story