मलायका झाली ट्रोल ; काय म्हणाले नेटकरी? बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तसेच डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. मलायकाला नेटकरी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल करतात. नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये मलायका व्हाईट कलरचा शर्ट, ब्राऊन कलरचा स्वेटर आणि पिच कलरचे शूज अशा लूकमध्ये दिसत आहे. मलायकाच्या या लूकला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अनेकांनी या व्हिडीओला कमेंट केली आहे. एका नेटकऱ्यानं मलायकाच्या लूकबद्दल कमेंट केली, 'पँट घरीच विसरली दीदी' तर दुसऱ्यानं कमेंटमध्ये लिहिले, 'माझ्या आजोबांकडे देखील असाच स्वेटर आहे.'