विकेटकीपर रिद्धिमान साहाच्या (Wriddhiman Saha) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय साहाकडे स्पष्टीकरण मागण्याची शक्यता आहे.
केंद्रीय करारातील खेळाडू असल्याने त्याने नियमांचे उल्लंघन केले आहे, असे बीसीसीआयचे मत आहे.
कसोटी मालिकेतून वगळण्यात आल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांच्यासोबत झालेली चर्चा साहाने सार्वजनिक केली होती.
केंद्रीय करारातील ब गटात असलेल्या साहाने नियम 6.3 चे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.
6.3 या नियमानुसार खेळाडू खेळ, अधिकारी, खेळातील घडामोडी, तंत्रज्ञानाचा वापर, निवडीच्या बाबी किंवा बीसीसीआयच्या मतानुसार खेळाशी संबंधित इतर विषयाबाबत मीडियामध्ये कोणतीही टिप्पणी करू शकत नाही.
परंतु, साहाने या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याची चौकशी होऊ शकते.
श्रीलंकेसोबत होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून रिद्धिमान साहाला वगळण्यात आले आहे.
त्याच्या जागी निवड समितीने आंध्र प्रदेशच्या खेळाडून के. एस. याला राखीव विकेटकीपर म्हणून संघात स्थान दिले आहे.
''संघ व्यवस्थापनाने फार पूर्वीच सांगितले होते की आता मला संघात स्थान दिले जाणार नाही. मी आजपर्यंत हे सांगितले नाही, कारण मी टीम सेट अपचा भाग होतो, असे रिद्धिमान म्हणाला होता.
प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही मला आधीच निवृत्तीचा विचार करण्याचा सल्ला दिल्याचे रिद्धिमान याने सांगितले होते.