अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधील चर्चात असणारी जोडी आहे.
मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.
वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते.
काही नेटकरी तिला 'म्हातारी अन् उतावळी', असंही म्हणत होते. या ट्रेलर्सला मलायकानं सडेतोड उत्तर दिलं आहे.
मलायकानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'आपण अशा समाजात राहतो, जो समाज बदलत्या वेळेनुसार प्रगती करत नाहिये. '
'एक मुलगी तिच्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या मुलाला डेट करत असेल तर त्या मुलीला लोक म्हातारी आणि उतावळी म्हणतात. मी या लोकांकडे लक्ष देत नाही.'असं मलायका म्हणाली.
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.
1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले.
लग्नाआधी मलायका आणि अरबाज हे जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते.