आपण या दृश्यात पाहतोय तो मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकचा परशुराम घाट..नागमोडी वळणाचा हा घाट..



मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला गेले काही वर्षांपासून सुरुवात झाली आहे..त्यात या घाटाचे काम चार वर्षे रखडलेले..

जमीनीच्या मोबदल्याच्या वादामुळे काम रखडले..या घाटाच्या खालच्या बाजूला वाशिष्टी वाहते..आणि तीच्या काठावर वसलेली वस्ती..



तर दुसऱ्या म्हणजेच घाटाच्या वरच्या बाजूला भगवान परशुरामाचे मंदीर आणि वस्ती..या दोघांच्या मधून हा घाट..आणि त्यातूनच मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास..

इथे असणाऱ्या गावकऱ्यांच्या जमीनी मोबदल्याच्या वाद शेवटी कोर्टात गेला आणि त्यावर कोर्टाने सबंधित ठेकेदार कंपनीला घाटाचे काम त्वरीत सुरु करण्याचे आदेश दिले..



णि त्यानुसार कामाला सुरुवातही झाली..गेल्या महिन्यात घाटाचे काम सुरु असतांना कापलेल्या डोंगराचा काही भाग खाली सरकला..

माती दगड गोठे खाली आल्याने काम करत असलेल्या यंत्रावर अचानक आल्याने तीन मशीन या मातीच्या ढिगाऱ्या खाली गेल्या त्यात एका मशीन चालकाला जीवही गमवावा लागला..



सध्या कोकणातील मोठा उत्सव मानला जाणारा शिमगोत्सव तोंडावर आला आहे..या उत्सवासाठी चाकरमानी मोठ्यासंख्येने कोकणात दाखल होतात..तळकोकणात जाण्यासाठी चाकरमानी,मुंबईकर जास्तीतजास्त याच महामार्गावरून प्रवास करतात..त्यामुळे धोकादायक घाटातून रात्रीचा प्रवास करतांना तेथे सुरक्षेतीच्या दृष्टीने सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे.. अशी स्थानिकांची मागणी आहे..