रशिया-युक्रेनमधील युद्धादरम्यान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी तिसऱ्या महायुद्धाचा उल्लेख केला आहे.

ते म्हणाले की, तिसरे महायुद्ध झाले तर त्यात अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो.

असे झाल्यास ते विनाशकारी ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

24 फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले.

यानंतर रशियाने अनेक शहरांना लक्ष्य केले आहे.

बुधवारी रशियन सैन्याने कीव्ह आणि खारकिव्हमध्ये हल्ले सुरूच ठेवले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खारकिव्ह शहरात रशियाच्या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला असून 112 जण जखमी झाले आहेत.