बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या स्टायलिश लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
मलायकाच्या लूकचे काही लोक कौतुक करतात तर काही लोक तिला ट्रोल करतात.
काही दिवसांपूर्वी मलायकाचे नेटेड ब्लॅक ड्रेस आणि हाय हिल्स अशा लूकमधील फोटो व्हायरल झाले होते.
मलायकाच्या त्या लूकला नेटकऱ्यांनी ट्रोल केले.
एका मुलाखतीमध्ये मलायकानं सांगितलं की, 'लोक ढोंगी आहेत. हॉलिवूड अभिनेत्री रिहाना,जेनिफर लोपेज आणि बियॉन्स जे कपडे घालतात त्या कपड्यांचे लोक कौतुक करतात. '
पुढे ती म्हणाली, 'लोकांनी ढोंगीपणा सोडून दिला पाहिजे. त्यांनी हॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे देखील कौतुक केले पाहिजे.'
पुढे मुलाखतीमध्ये मलायकानं सांगितलं की ट्रोल करणाऱ्यांकडे ती लक्ष देत नाही पण तिचे आई-वडील या ट्रोलर्सकडे लक्ष देतात.
मलायकाला अनेक वेळा तिच्या आणि अर्जुनच्या नात्यामुळे देखील ट्रोल केले जाते.