देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने कमी होत असल्याची दिलासादायक माहिती आहे देशात गेल्या 24 तासांत 4184 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 104 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44,488 इतकी झाली आहे काल 4 हजार 575 नवीन रुग्ण आणि 145 मृत्यूची नोंद झाली होती म्हणजेच कालच्या तुलनेत आज रुग्ण संख्या कमी झाली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44 हजार 488 इतकी कमी झाली आहे कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 15 हजार 459 झाली आहे देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 20 हजार 120 लोक संसर्गमुक्त झाले आहेत देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे आतापर्यंत 179 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत मंगळवारी दिवसभरात 18 लाख 23 हजार 329 डोस देण्यात आले आतापर्यंत 179 कोटी 53 लाख 95 हजार 649 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत