प्रिया प्रकाश वारियरनं नुकतेच तिचे खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये प्रिया ही ब्लॅक टू पिस, गोल्डन ज्वेलरी आणि हिरव्या बांगड्या अशा लूकमध्ये दिसत आहे. प्रियाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. प्रियानं या फोटोला 'राधा' असं कॅप्शन दिलं आहे. प्रियाच्या सोशल मीडिया पोस्टवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. प्रियानं या लूकमधील एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 'जब सैयां' असं कॅप्शन व्हिडीओला प्रियानं दिलं. प्रियाच्या चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करून तिच्या लूकचं कौतुक केलं.