सध्या ग्रीन कॉफी अधिक चर्चेत आहे



'ग्रीन कॉफी' (Green Coffee) म्हणजे हिरवी कॉफी बनवण्यासाठी हिरव्या रंगाच्या बिया कॉफीच्या रोपापासून वेगळ्या केल्या जातात आणि नंतर त्या भाजल्या जातात



या बिया बारीक केल्यानंतर कॉफी पावडर बनवली जाते



हिरव्या बिया न भाजता वाळवून हिरवी कॉफी पावडर तयार केली जाते



म्हणजे कॉफी बीन्स पूर्णपणे भाजून न घेता त्यांचा हिरवा रंग कायम ठेवून कॉफी बीन्सपासून बनवलेल्या कॉफीला 'ग्रीन कॉफी' म्हणतात



ग्रीन कॉफीमध्ये अँटीओबेसिटी फॅक्टर असते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते



याव्यतिरिक्त, ग्रीन कॉफीमध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट्स कार्बोहायड्रेट्स देखील असतात, ज्यामुळे एखाद्याला पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते



ग्रीन कॉफीमुळे चयापचय क्रिया व्यवस्थित राहते



काही संशोधनात असे आढळून आले आहे की, रक्तदाबाच्या रुग्णांनाही कॉफीचा फायदा होतो



ग्रीन कॉफी पिल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो



ग्रीन कॉफीमुळे हृदयविकाराचा झटका, किडनी फेल्युअर यासारखे मोठे आजार प्रतिबंधित केले जाऊ शकते