उपाशीपोटी गव्हांकूराचा रस घेतल्याने मूतखड्याचा त्रास कमी होतो. गहू भिजवून ते पाणी प्यावे. नियमीत डाळींबाचा रस प्या. द्राक्षाचा रस , गाजराचा रस हे एकत्र करून प्यावे. उसाचा रस देखील मूतखड्यावर उपयुक्त ठरतो. कांदा पाण्यात घालून ते पाणी प्यावे. लिंबूपाणी पिणं फायद्याचे ठरू शकते. साखर आणि मीठ न घालता मध घालून लिंबूपाणी प्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. नारळाचे पाणी नियमीत प्या.