मकर संक्रांत अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे.

झटपट आणि स्वादिष्ट तिळाचे लाडू घरी बनवायचे आहेत तर ही रेसिपी फॉलो करा.

सर्वात आधी तीळ छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यावे.

यानंतर कढईत तूप टाका आणि यात चिकीचा गूळ घालून मंद आचेवर गुळ विरघळू द्या.

पाक करताना तो सतत ढवळत राहावं.

पाक व्यवस्थित झाल्यानंतर त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, वेलची पूड, काजू, बदाम, भाजलेले सुके खोबरे, चण्याची डाळ टाकून व्यवस्थित एकजीव करा.

गरम असतानाच लाडू वळा.

लाडू वळताना हाताला थोडे तूप लावा ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.

अशा प्रकारे तिळाचे लाडू तयार झाले.

या मकर संक्रांतीला घरगुती तिळाच्या लाडूंनी कुटुंबीयांचे तोंड गोड करा.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.