स्वामी विवेकानंद यांचे काही विचार मनाला ऊर्जा देऊन जातात.



आज जरी ते आपल्यात नसले तरी लोकं त्यांच्या विचारांना आठवून किंवा वाचून प्रेरणा घेत राहतात.



स्वामी विवेकानंद वेळेला सर्वात किंमती मानत असत. ते आापला अधिकाधिक वेळ सेवा करण्यासाठी लावतं.



चला तर जाणून घेऊयात त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी ज्या आयुष्य बदलतील.



ज्या वेळी तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणी थांबतील. तेव्हा समजून जा की तुम्ही चूकीच्या मार्गावर चालत आहात.



स्वतंत्र होण्याचं धाडस करा, तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा. त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होईल.



उठा, जागे व्हा, आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.



जर तुमच्या मेंदू आणि मनामध्ये संघर्ष सुरू असेल तर कायम आपल्या मनाचं ऐका.



जो व्यक्ती सांसारिक गोष्टींच्या लोभात अडकत नाही त्यानेच खऱ्या अर्थानं अमरत्व प्राप्त केलंय असं समजावं.



हे जग एकप्रकारची व्यायामशाळाच आहे. जिथे आपण स्वत:ला शक्तिशाली बनवण्यासाठी येतो.