बाईक, स्कूटरची हेडलाईट चालू राहण्यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घ्या.

बाईक, स्कूटर हे वाहन सुरु होताच त्याचे हेडलाईट देखील सुरु होतात.

याला बंद करण्यासाठी कोणतंही बटण दिलेलं नसतं.

या आधीच्या दुचाकी वाहनांमध्ये ही सुविधा उपलब्ध नव्हती.

दुचाकी वाहनामध्ये हा बदल 1 एप्रिल 2017 मध्ये करण्यात आला.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाढत्या दुर्घटना लक्षात घेता हा निर्णय घेतला.

याला ऑटोमॅटिक हेडलाईट ऑन (AOH) फिचर असं म्हटलं जातं.

रस्त्यावर लहान वाहनांची दृश्यमानता कमी असते.

खराब वातावरणात हे छोटे वाहन दिसत नाहीत.

बाईकचे हेडलाईट चालू राहिल्यास त्याची दृश्यमानता वाढते.