प्राचीन भारतातील १६ महाजनपदांपैकी एक मगध साम्राज्य होते.

ज्याची राजधानी पाटलीपुत्र होती.

काही इतिहासकारांचे असे मत आहे की, पाणीपुरी प्रथम मगध काळात बनवली गेली.

ही त्या काळातली गोष्ट आहे ज्या काळात कागदी पोह्यांचा चिवडा, तिळ, लिट्टी चोखा इत्यादी बनवले जात होते.

महाभारतात यासंबंधीचा कोणताही पुरावा नाही,

परंतु प्रचलित असलेल्या आख्यायिकेनुसार जेव्हा द्रौपदी तिच्या सासरी पोहोचली तेव्हा पांडव वनवास करत होते.

द्रौपदी ही पाच पतींची पत्नी झाली.

कुंतीने द्रौपदीला पाच पांडवांची भूक शमवेल असे काहीतरी बनवण्याची सूचना केली.

त्यावेळी द्रौपदीने पाणीपुरी बनवली असे सांगण्यात येते.

कुंतीला पाणीपुरीची चव इतकी आवडली की तिने या पदार्थाला अमरत्व प्राप्त करून दिले.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.