बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताची लेक अभिनेत्री मसाबा गुप्ता नुकतीच सत्यदीप मिश्रासोबत लग्नबंधनात अडकली आहे. मसाबा आणि सत्यदीप दोघांचही हे दुसरं लग्न आहे. मसाबाने सोशल मीडियावर सत्यदीप सोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना लग्नाची माहिती दिली आहे. 'मसाबा मसाबा' या वेबसीरिजमध्ये सत्यदीपने मसाबासोबत काम केलं होतं. 'मसाबा मसाबा' या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान मसाबा आणि सत्यदीपची ओळख झाली. मसाबाने सत्यदीपसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, आज सकाळी शांत महासागराशी मी लग्न केलं आहे. या महासागरात प्रेम, शांतता, स्थिरता आणि हास्य आहे. मसाबाच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मसाबा आणि सत्यदीपचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मसाबा गुप्ताच्या लग्नसोहळ्यातील लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मसाबा गुप्ता आणि सत्यदीपचा मोठा चाहतावर्ग आहे.