महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीविषयी लोक त्यांची आठवण काढतात. महात्मा गांधींच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या चष्मा. तुम्हाला माहित आहे का महात्मा गांधी यांच्या चष्म्याचा लिलाव किती रुपयांना झाला होता. महात्मा गांधी यांच्या चष्म्याचा लिलाव हा दोन कोटी 55 लाख रुपयांना झाला होता. हा चष्मा अमेरिकेतील एका कलेक्टरने विकत घेतला होता. हा लिलाव इस्ट ब्रिस्टल ऑक्शन्स या संस्थेद्वारे करण्यात आला होता. या आधी महात्मा गांधी यांच्या पत्राचा लिलाव करण्यात आला होता. हे पत्र 15 हजार पौंडला विकले गेले होते. त्यांची चप्पल देखील 19 हजार पौंडाना विकली गेली होती.