भारताच्या ‘गगनयान’च्या (Gaganyaan) प्रो मॉड्युलनं गगनभरारी घेतली.

गगनयान अभियानाची पहिली चाचणी यशस्वी झाली.

या यशस्वी चाचणीमुळे भारतानं अवकाश मोहिमेत आणखी एक इतिहास रचला आहे

रविवारी सकाळी 10 च्या सुमारास इस्रोच्या श्रीहरीकोटा इथल्या

सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन गगनयानचं क्रू मॉडेल लाँच करण्यात आलं.

यालाच टेस्ट व्हिकल अबॉर्ट मिशन-1, टेस्ट व्हिकल डेवलपमेंट फ्लाईट असंही म्हणलं जात आहे.

इस्रोच्या गगनयान मोहिमेअंतर्गत श्रीहरीकोटा इथे काही क्षणात पहिलं चाचणी उड्डाण प्रक्षेपित करण्यात आलं.

आधी ही चाचणी खराब हवामान आणि तांत्रिक कारणामुळे रद्द करण्याची घोषणा झाली होती.

मात्र आता तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून उड्डाण चाचणी सकाळी दहा वाजता करण्यात आली.

दरम्यान, गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे