राज्याच्या विविध विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे.

या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कारण शेतकरी अनेक दिवसापासून पावसाची वाट पाहत होते.

मात्र, काही ठिकाणी वादळी पाऊस झाल्यामुळं शेती पिकांना फटका बसला आहे.

नाशिक जिल्ह्यात वादळी पावसानं हजेरी लावली आहे.

त्यामुळं अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

तसेच या पावसामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.

कांदा व्यापाऱ्यांच्या शेडवरील पत्रे उडाले आहेत.

सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

गेल्या तासाभरापासून सोलापूर शहरात तुफान पावसाला सुरुवात झाली आहे.

परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.