राज्यातील जनतेसाठी अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे.
नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Rain) महाराष्ट्रात आगमन झालं आहे.
याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार,
आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.
विदर्भासह मकाठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊास झालाय.
याचा शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसताना दिसत आहे.
जिल्ह्यातील खामगाव, शेगाव , संग्रामपूर या परिसरात रात्रभर पावसाच्या सरी सुरू होत्या.