5 डिसेंबरला फक्त मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.

भाजपच्या विधिमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आज महायुतीकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे.

दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेटून, तिन्ही नेते सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सोपवणार आहेत.

त्यानंतर उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबरला आझाद मैदानात शपथविधी पार पडणार आहे.

उद्या पार पडणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उद्या आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची महायुतीच्या सूत्रांची माहिती आहे.

घटकपक्षांना मंत्र्यांच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित झाल्यावरच इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.



उद्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.