महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवत विजय मिळवला.
महायुतीच्या विजयानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला 132 जागा मिळाल्याने मुख्यमंत्रिपद भाजपकडे असणार आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे पदश्रेष्ठींकडून निश्चित झालं आहे.
एकीकडे नव्या सरकारच्या शपथिविधीची तयारी असताना दुसरीकडे पुण्याच्या खासदाराला मुख्यमंत्रिपद मिळेल, अशी चर्चा अचानक सोशल मीडियावर सुरु झाली.
आता मुख्यमंत्रिपदासाठी अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या नावाची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू असल्याचं दिसतंय.
मुरलीधर मोहोळ यांना खासदारकीवरून थेट मुख्यमंत्री अशी पुन्हा लॉटरी लागणार अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येऊ लागल्या होत्या.
अशात मुरलीधर मोहोळांनी मात्र या बातमीचं खंडन करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय.