आज महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागणार आहे
सुरुवातीच्या सर्व कलांमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे.
पण आजचा तो दिवस आणि वार सुद्धा आहे.
23 नोव्हेंबर 2019 म्हणजेच आजच्या दिवशी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण झाली.
सकाळी आठ वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
अचानक हे नवं सरकार आलेलं पाहून सर्वांना धक्का बसला होता.
परंतु, हे सरकार मात्र तीन दिवसात कोसळलं.
मागील 5 वर्षात 3 मुख्यमंत्री आणि 4 उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यात झाले.