देवेंद्र फडणवीसच भाजपचे विधिमंडळ पक्षनेते ठरले आहेत.

यामुळे आता देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा प्रस्ताव मांडला. यावर सर्वांनी संमती दर्शवली.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली.

त्यामध्ये भाजपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आलं.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर सर्वांचं एकमत झालं.

त्यानंतर आता विधिमंडळ पक्ष बैठकीतही त्यांचं नाव संमत झालं आहे.