तप्त उन्हामुळं अंगाची लाही लाही होतानाचे चित्र अनेक ठिकाणी आहे.
मात्र मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये परिस्थिती काही वेगळीच आहे.
महाबळेश्वरातील दुपारचे तापमान जास्त असते.
मात्र सुर्यास्तानंतर महाबळेश्वर फिरायला आलेल्या पर्यटकांना थंडीचा सामना करावा लागतोय.
सायंकाळच्या वेळेस पर्यटकांना स्वेटर, कानटोपीचा आधार घ्यावा लागत आहे