जरांगे पाटलांमुळे मराठा तरुणांचं होतंय नुकसान : वडेट्टीवार



मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून रोज नवे वादंग सुरू



मराठ्यांना जर ईडब्ल्यूएस आरक्षणातून दहा टक्के आरक्षण मिळत असेल, तर तो खूप मोठा फायदा होत आहे.



परंतु, जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा करुन घेण्याची मंशा असावी.



जरांगे मराठा तरुणांच्या फायद्यापेक्षा राजकीय लोकांच्या भल्यासाठी आग्रही आहेत,



विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा तरुणांच्या भविष्याच्या दृष्टीनं भाष्य केलं आहे.



जरांगे पाटलांच्या सध्याच्या भूमिकेमुळे मराठा तरुणांचं भविष्यात फार मोठं नुकसान होणार आहे.



मराठा तरुणांचं कशात भलं आहे आणि कशात वाईट आहे, हे त्यांनी ठरवावं.



जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर त्यांनी सर्व काही ठरवू नये.



अभ्यास करून त्यांनी भविष्याबद्दल निर्णय घ्यावा- वडेट्टीवार सल्ला