यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवान सिंकदर शेखने पटकावला आहे.



गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला चितपट करत सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे.



मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा सन्मान करण्यात आला.



प्रदीपदादा कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन केलं होतं.



पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु होती.



या स्पर्धेतील अखेरची लढत सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली.



कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या साडे पाच सेकंदात 66 व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला.



अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला 22 सेकंदाला झोळी डावावर चितपट केले.



या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे 42 संघ भिडले.



एका कुस्ती संघात गादी विभागातील 10 आणि माती विभागातील 10 असे एकूण 20 कुस्तीगीर 2 कुस्ती मार्गदर्शक आणि 1 संघ व्यवस्थापक असे एकूण 23 जणांचा सहभाग होता.