जगात सर्वात महाग विकलं जाणारं विष कोणत्याही सापाचं नसून विंचवाचं असतं.



या विंचवाच्या 1 मिलीलीटर विषाची किंमत सुमारे 8.5 लाख रुपये आहे.



डेथस्टॉकर विंचवामध्ये हे सर्वात महागडं विष आढळतं.कारण म्हणजे,



हा विंचू एका वेळी फक्त दोन मिलीलीटर विष देऊ शकत



त्यामुळे जर तुम्हाला एक गॅलन विष हवं असेल तर तुम्हाला सुमारे 26 लाख विंचवांचं विष काढावं लागेल.



या विंचवाचं विष इतकं धोकादायक आहे की, जर या विंचवानं तुम्हाला दंश केला तर तुम्हाला असह्य वेदना होतील.



डेथस्टॉकर विंचू संपूर्ण जगात फक्त वाळवंटी भागातच आढळतो.



उत्तर आफ्रिकेपासून मध्य पूर्वेपर्यंतच्या वाळवंटात तुम्हाला हा विंचू सहज सापडेल.



हा विंचू राजस्थानच्या थारच्या वाळवंटातही आढळतो.



या विंचवाचे विष काढण्याचे काम राजस्थानातील काही लोक करतात.