पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चर्चेत आहेत.



काही दिवसांपूर्वी ते 'एबंडेंस इन मिलेट्स' या गाण्याच्या गीतलेखनामुळे चर्चेत आले होते.



आता पंतप्रधानांनी लिहिलेलं हे गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट झालं आहे.



धान्याचे फायदे जास्तीत जास्त लोकांना कळावेत यासाठी त्यांनी हे गाणं लिहिलं होतं.



गाण्याला जागतिक पातळीवरील संगीतक्षेत्रात महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.



या गाण्याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे.



पंतप्रधानांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं आहे.



ग्रॅमी पुरस्कार विजेती भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाहच्या मदतीने पंतप्रधानांनी हे गाणं लिहिलं आहे.



बाजरीसारख्या पौष्टिक धान्याचा प्रचार व्हावा यासाठी त्यांनी हे गाणं लिहिलं आहे.



अन्न सुरक्षा देण्याच्या आणि उपासमारी दूर करण्याच्या महत्त्वाच्या ध्येयाला या गाण्यातून सर्जनशीलतेची जोड मिळाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.