साताऱ्यात पसरणी येथील भैरवनाथ नगर येथे ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. उसाने भरलेला ट्रक कारखान्याला गाळप करण्यासाठी निघाला होता. या घटनेमुळे शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. रस्ता अरुंद असल्याने ट्रकचे चाक खड्ड्यात अडकल्याने ट्रक एका बाजूला कलला. ट्रकला वाचवण्याचे चालकाने आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केले . मात्र ट्रक हळू हळू कलत गेला आणि कालव्यात कोसळला. हा पसरणी वाई येथील धोम धरणाचा डाव्या कालवा आहे. पाण्याला प्रवाह असल्यामुळे यातील मोठ्या प्रमाणात ऊस पाण्यातून वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरू होते