लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीटच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.

दरम्यान श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्टवृष्टी करण्यात आलीये.

याठिकाणी लालबागच्या राजाची आरती देखील करण्यात आली.

मोठा जनसगार लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी उसळला आहे.

भर पावसातही मुंबईकर लाडक्या बाप्पाला निरोप देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अगदी वाजत गाजत लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

लालबाग परिसर राजाला निरोप देण्यासाठी गजबजून गेल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

रात्रभर लालबागच्या राजाची मिरवणूक ही सुरु असते.

तर पहाटे गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात येते.

नवसाचा बाप्पा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची चरणी अनेक जण नतमस्तक होत असतात.