दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांचं सेना समर्थन कशी करू शकते?



शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केलेल्या वक्तव्यावर आता एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.



''बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर.'' ते ट्वीट करून असं म्हणाले आहेत.



एकनाथ शिंदे ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे



यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल. आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.''



शिंदे यांनी ट्वीट करत संजय राऊत यांनाही टॅग केलं आहे. तसेच त्यांनी या ट्विटसह #MiShivsainik हे हॅशटॅग ही जोडले आहे.



दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय राऊत म्हणजे होते की,



गुवाहाटीमध्ये एक मंदिर आहे. या मंदिरात रेड्याचा बळी दिला जातो. आम्ही 40 रेडे पाठवले आहेत.''



शिंदे यांनी एकामागून एक असे दोन ट्वीट केलं आहे. आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणाले आहेत की,



हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी



आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू, असं ते ट्वीट करून म्हणाले आहेत.