अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील 'देवळाली-प्रवरा' या ठिकाणी झाला.

अजित पवार यांचा विवाह राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्याशी झाला.

अजित पवारांनी पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत पूर्ण केलं. त्यांच्याकडे बी. कॉम. (B. Com.) ही पदवी आहे.

अजित पवारांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला.

खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेते असा अजित पवार यांचा राजकीय प्रवास आहे.

अजित पवार 1991 साली बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले.

या काळात ते कृषी, फलोत्पादन आणि उर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते. 1991 ते 1995 या काळात ते विधानसभा सदस्य होते.

अजित पवार नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 या काळात जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते.

1999 ते 2004 या काळात ते पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे आणि फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते.

1995 पासून 2019 पर्यंत सलग 7 वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.