संघाच्या स्थापनेच्या 2 वर्षानंतर म्हणजेच, 1927 पासून संघ शिक्षा वर्ग होतात.

त्या काळात या वर्गाना ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प म्हणजेच OTC म्हंटले जायचे.

स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात 40 दिवसांच्या प्रशिक्षणात सैन्यासारखं प्रशिक्षण स्वयंसेवकांना दिलं जायचं.

स्वातंत्र्य नंतर OTC ला 'संघ शिक्षा वर्ग' संबोधलं गेलं आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात प्रशिक्षणात शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षणावर जोर असायचा.

नंतर हळूहळू त्यात आपत्ती व्यवस्थापन, ग्रामविकास, कृषी, प्रचार, प्रसार माध्यम असे नवे विषयही आले आहेत.

संघ शिक्षा वर्गात स्वयंसेवकांना तीन वर्षांचं प्रशिक्षण दिलं जातं.

प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचं प्रशिक्षण देश भरात अनेक ठिकाणी पार पडतात.

मात्र, तिसऱ्या वर्षाचं प्रशिक्षण घेण्यासाठी प्रथम आणि द्वितीय वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्वयंसेवकांना नागपुररातील रेशीमबागेत यावं लागतं.

तृतीय वर्षाचं प्रशिक्षण आधी चाळीस दिवसांचं असायचं. सध्या त्याचा कालावधी 25 दिवसांचा असतो.