महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी स्पर्धा तब्बल दोन वर्षानंतर पार पडत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे ही स्पर्धा मागील दोन वर्षे झाली नव्हती, पण आता साताऱ्यात ही स्पर्धा पार पडत आहे. अंतिम सामन्यात विजेत्या पैलवानाला मिळणारी मानाची गदा मैदानात दाखल 86 ते 125 किलो वजनी गटाच्या माती आणि गादी विभागाच्या अंतिम फेरीत विजयी झालेले दोन पैलवान आमनेसामने दोघेही कोल्हापूरच्या तालमीत तयार झाले आहेत. पण यातील एक पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचं तर दुसरा विशाल बनकर मुंबईचं प्रतिनिधित्व करत आहे. पृथ्वीराजला मॅटवरच्या कुस्त्यांचा तसंच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अधिक अनुभव पण दुसरीकडे विशाललाही तगडा अनुभव आहे. पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान आज पृथ्वीराज जिंकल्यास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळेल.