चवीला कडू असल्यामुळे काहींना कारले खाणे अजिबात आवडत नाहीत. मात्र, कारले जितके कडू तितकेच त्याचे गुणकारी फायदेही आहेत. जखमेवर कारल्याचे मूळ चोळल्याने जखम लवकर सुकते. कारल्यामुळे तोंडातील फोडी बऱ्या होतात. कारल्याची पाने बारीक करून कपाळावर लावा. असे केल्याने डोकेदुखीमध्ये त्वरित आराम मिळेल. कारल्याचा रस प्यायल्याने मुतखड्यांच्या समस्येमध्ये लगेच आराम मिळतो. कच्चे कारले विस्तवात भाजून खाल्ल्याने गुडघेदुखीची समस्या दूर होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.