प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेनं नुकतीच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.



पोस्टमध्ये राहुलनं त्याच्या मुलीला म्हणजेच रेणुका देशपांडेला तिच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.



राहुलनं रेणुकाचे काही फोटो शेअर केले आहेत.



रेणुकाच्या फोटोला राहुलनं कॅप्शन दिलं, 'डियर रेणुका, तु मला जेव्हा माझी चुक दाखवतेस तसेच जेव्हा तुला मी जिथे जाईल तिथे माझ्यासोबत यायचं असतं आणि जेव्हा तुला माझी आठवण येते, तेव्हा तु मला खूप आवडते.'



आज (9 एप्रिल) रेणुका सात वर्षाची झाली आहे.



गायिका सावनी रविंद्र, अभिनेत्री सायली संजीव, गायिका प्रियांका बर्वे यांनी राहुलच्या या पोस्टला कमेंट करून रेणुकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



तसेच राहुलच्या चाहत्यांनी देखील रेणुकाला शुभेच्छा दिल्या



रेणुकासोबत गाण गातानाचे व्हिडीओ राहुल सोशल मीडियावर शेअर करतो.