भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 150 नवीन रुग्ण आढळले असून 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे सध्या देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 365 आहे देशातील कोरोनाबळींची संख्या 5 लाख 21 हजार 656 वर पोहोचली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.76 टक्के आहे देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 34 हजार 217 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत सक्रिय कोरोना प्रकरणात 24 तासांमध्ये 147 रुग्णांची घट झाली आहे कोरोनाचा दैनिक सकारात्मकता दर 0.24 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 0.23 टक्के आहे देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत मात्र काही राज्ये अशी आहेत जिथे कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाच पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी कोरोनाचा वाढता पॉझिटिव्ह दर आणि रुग्णांबाबत केरळ, मिझोराम, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा या पाच राज्यांना पत्र लिहिले आहे