सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाला खास आरास



गुढीपाडव्यानिमित्त द्राक्षाची आरास करण्यात आले आहे.



सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील खंडेरायाचे भक्त संभाजी आणि अशोक देशमुख या बंधूनी द्राक्षे पाठवली.



या मधुर द्राक्षांतून देवाच्या गाभार्‍याला पुजारी व सेवेकर्‍यांनी आकर्षक सजावट केली



सजावटीनंतर द्राक्षांचा नैवेद्य अर्पण केला.



सध्या कडक उन्हाळा असल्याने या द्राक्षांमुळे गाभार्‍यामध्ये गारवा निर्माण झाला.



हिरव्यागार द्राक्ष वेलींच्या सजावटीमुळे खंडेरायाचे रुप अधिकच खुलून दिसले.



जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी भक्तांनी 501 किलो द्राक्षांची आरास केली आहे



देवाच्या श्रध्देपोटी देशमुख बंधुंनी जेजुरीला द्राक्षे पाठवून आपली सेवा सादर केली.



जेजुरीचे मानकरी मयुर केंजळे यांच्या सहकार्याने ही आरास करण्यात आली