कॉमेडी किंग अभिनेता कपिल शर्मा आज त्याचा 41वा वाढदिवस पण कधीकाळी कपिलला गायक व्हायचे होते. 2005 मध्ये कपिलला एका पंजाबी वाहिनीवरील कॉमेडी शोमध्ये कॉमेडी करण्याची संधी मिळाली या शोमध्ये तो सेकंड रनर अप ठरला होता आणि हा शो त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर कपिल थांबला नाही आणि 2007 मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या सीझन 3मध्ये त्याने भाग घेतला आणि तो शोचा विजेता बनला. 2010 ते 2013 या कालावधीत 'कॉमेडी सर्कस'चा विजेता ठरला. तेव्हापासून आजतागायत त्यांची गाडी थांबलेली नाही. कपिलची आई जनक राणी यांनी सांगितले की, कपिलने अमृतसरमध्ये पीसीओमध्ये काम करायला सुरुवात केली. 2007 मध्ये तो 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' सीझन 3 चा विजेता बनला, त्याला बक्षीस म्हणून 10 लाख रुपये मिळाले.