आजपासन नवीनवर्षाला सुरुवात झाली आहे.
अनेकांनी नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने केली आहे.
2023 हे नवीन वर्ष सुखासमाधानाचं जावं अशी प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करत आहे.
राज्यासह देशभरात प्रसिद्ध मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे.
शिर्डीतील साईबाबा मंदिर
वर्षाचा पहिलाच रविवार असल्याने आज दिवसभर भाविकांची मोठी गर्दी राहणार आहे.
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर
कोल्हापूरमधील श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात अंबाबाईचे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विट्ठल, रखुमाई मंदिराला आकर्षक फळे आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.
आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकूर यांनी ही सजावटीची सेवा केली आहे.