महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला; हजारहून सक्रिय रुग्णांची नोंद
देशासह राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झालेला कोरोना संसर्ग आता पुन्हा वाढत आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सतर्क झालं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे सातत्याने वाढत असलेले रुग्ण पाहता आरोग्य विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. महाराष्ट्रासह गुजरातमध्येही कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढत आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या चार महिन्यांमध्ये कमी झाली होती. पण, गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र आहे.
महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आता कोरोना संसर्गाचे 1,308 सक्रिय रुग्ण असून त्यांचावर उपचार सुरु आहेत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, रविवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 236 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
या नव्याने नोंद झालेल्या रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण संख्या 81,39,737 वर पोहोचली. दरम्यान, गेल्या 24 तासांत 92 रुग्ण बरे झाले आहेत.
आतापर्यंत राज्यात 79,90,001 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. राज्यात सध्या 1,308 सक्रिय कोरोनाबाधित आहेत.