बाजारात अनेक कंपान्यांच्या पाण्याच्या बॉटल विकत मिळतात. या बॉटलचे जे टोपण असतं, त्याच्या रंगांचं एक विशेष कारण असतं. झाकणाचे विविध रंग पाण्याविषयी माहिती देत असतात. प्रत्येक रंग हा त्या बॉटलमधील पाण्याचा स्रोताविषयी माहिती देतो. जर बॉटलचं झाकण सफेद रंगाचं असेल तर ते पाणी प्रक्रिया केलेलं असतं. झाकण जर काळ्या रंगाचं असेल तर ते पाणी अल्कालाइन आहे. झाकण निळ्या रंगाचं असेल तर त्यामध्ये धरणाचं पाणी असतं. हिरव्या रंगाच्या पाण्याच्या बॉटलमध्ये फ्लेवर मिसळलेला असतो. काही ब्रँड्स हे त्यांच्या हिशोबाने झाकणाचे रंग निश्चित करतात. पण हे ब्रँड्स पाण्याविषयी सविस्तर माहिती देखील देतात.