जेव्हा आपण बाजारातून एखादी वस्तू खरेदी तेव्हा त्यावरील आधी एक्स्पायरी डेट तपासतो आणि वस्तू विकत घेतो.
आरोग्याच्या दृष्टीने ही जागरुकता खूप गरजेचीसुद्धा आहे.
यानंतरही बाजारात एक्स्पायरी डेट संपल्यानंतरही वस्तू विकल्या जातात.
यापैकीच एक वस्तू आहे LPG gas cylinder. याचा आपल्या दररोजच्या आयुष्याशी संपर्क येत असते.
कोणत्याही एलपीजी सिलेंडरवर ज्या तीन पट्ट्या असतात, त्यावर ठळक अक्षरामध्ये एक कोड लिहिलेला असतो.
हा कोड म्हणजेच सिलेंडरची एक्स्पायरी डेट.
हा कोड A-24, B-25, C-26 आणि D-27 असा असतो.
या कोडमधील ABCD ही इंग्रजी अक्षरे महिना दर्शवतात
तर त्यामागील लिहिलेला क्रमांक कोणतं वर्ष आहे, याची माहिती देतात
साधारपणे एक सिलेंडर 15 वर्षापर्यंत वापरता येऊ शकतं