केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका करायची असल्याच हेअर डिटाॅक्स हा पर्याय फायदेशीर ठरेल. हेअर डिटाॅक्स म्हणजे काय आणि त्याचेफायदे काय आहेत हे जाणून घ्या. आपण शॅम्पूने केस धुतो. यामुळे स्वच्छ होण्यास मदत होते, पण अनेक वेळा केस मुळापासून साफ होत नाहीत. व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा आपण केस स्वच्छपणे धुत नाही, त्यामुळे केसांच्या मुळांशी साठलेली घाण, धूळ निघत नाही. प्रदुषणामुळेही केसांवर वाईट परिणाम होऊन घाणीचा थर जमा होतो. यामुळे केस कोरडे होऊन गळतात, अशावेळी हेअर डिटाॅक्स करणे फार गरजेचे आहे. यामुळे केसांची वाढ होण्यासही मदत होते. एका वाटीत मुलतानी माती घ्या. यामध्ये तीन चमचे ॲलोवेरा जेल आणि दोन चमचे ॲपल साईडर व्हिनेगर मिसळा. याची पेस्ट बनवून केसांच्या मुळांशी मसाज करा. केसांना हे मिश्रण तसेच ठेऊन 15 मिनिटानंतर केस धुवा. रिपोर्टनुसार मुलतानी माती केसांना मुलायम बनवते. तसेच केसांच्या मुळांशी जमा झालेली घाण मुलतानी मातीच्या वापराने साफ होते. ॲपल सायडर व्हिनेगर केसात बॅक्टेरीया मारते, यामुळे केस स्वच्छ होतात.